Ad will apear here
Next
पंढरपूरच्या पायी वारीचा इतिहास
दर वर्षी निघणारी वारी ही महाराष्ट्राच्या सांकृतिक आणि धार्मिक परंपरेचा मानबिंदू आहे. तसाच तो वारकरी संप्रदायाचाही एक भाग आहे. पंढरपूरला जाणारी आषाढी वारी हा केवळ राज्याचा नव्हे, तर देश-विदेशातील नागरिकांच्या आदराचा आणि उत्सुकतेचा भाग आहे. नीता अंकुश टेंगले यांनी आषाढी वारीचा सर्व बाजूने अभ्यास करून तो वाचकांसमोर मांडला आहे.

‘वारीची पार्श्वभूमी’ या प्रकरणात भक्ती, मार्ग, भागवत संप्रदाय यांचे विवेचन आले आहे. त्यानंतरच्या प्रकरणात ऐतिहासिक मागोवा घेतला आहे. ‘वारीचे धार्मिक व सामाजिक महत्त्व’ या प्रकरणात अभंग, कीर्तन, भारुड, लोककला आदींवर प्रकाश टाकला आहे. ‘वारीमार्गातील समस्या’ या प्रकरणात सार्वजनिक स्वच्छता, चंद्रभागा नदीचे प्रदूषण, वारकऱ्यांना वारी काळात येणाऱ्या समस्या आदींचा अभ्यास आहे.

प्रकाशक : यशोदीप पब्लिकेशन्स
पाने : १५२
किंमत : २८० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZRYBQ
 Valuable contribution to social history .
 Hard facts are , and must reman , backbone of a narrative , if it is to be
accepted as History . Dates , identities of people involved , lists of sources , --- these are the Musts for the purpose .
Similar Posts
अभंग : स्वरूप आणि चिकित्सा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अभंग हाही एक भाग आहे. अभंग हा जसा आध्यात्मिक जीवनाचा एक भाग आहे, तसाच सामाजिक जीवनाचाही. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांच्या अभंगवाणीने अवघा महाराष्ट्र घडवला. प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांनी या पुस्तकात अभंगाचे स्वरूप सांगून चिकित्सा केली आहे. संतांची
श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभांचे हे रसाळ जीवनचरित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी वाचकांसमोर आणले आहे. चौदाव्या शतकात जन्मलेले श्रीपाद वल्लभ आज एकविसाव्या शतकातही प्रिय आहेत, पूजनीय आहेत, ते त्यांच्या अजरामर कार्यामुळे. विजयनगरचे हिंदू साम्राज्य स्थापन करण्याची मूळ प्रेरणा श्रीपादांची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही
महाभारत - पहिला इतिहास केवळ भारताचा नव्हे, तर साऱ्या जगाचाच आरसा असलेले महाभारत पुन्हा पुन्हा वाचले, तरी नवी दृष्टी देऊन जाते. वि. ग. कानिटकर यांनी या पुस्तकात महाभारताची कथा रसाळ वर्णिली आहे. सर्व रसांचा समुच्चय असलेले महाभारत मानवी मने, भावभावना, नातेसंबंध, हिंसा आणि शांती आदींचे दर्शन घडवते. कानिटकर यांनी आदिपर्व, सभापर्व,
सोळा संस्कार- का आणि कसे + व्रतवैकल्ये कोणी- कोणती-का करावी? जीवन समृद्ध होण्यासाठी मनावर आणि बुद्धीवर संस्कार होणे आवश्यक असते. आर्य वैदिक धर्मात त्यासाठी १६ संस्कार कोणते, त्यांचे स्वरूप काय, त्याचा हेतू काय याची माहिती वेदमूर्ती श्रीकांत चितळे गुरुजी यांनी या पुस्तकात दिली आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे हे संस्कार आहेत. ते विधीपूर्वक केले जातात. श्रवण सुरू झाला की व्रतवैकल्ये सुरू होतात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language